रोहा: रोह्यात नाकाबंदीत टेम्पोभर गुटखा जप्त
पोलिसांनी पाठलाग करुन चालकाची केली धरपकड; 6 जण ताब्यात, 2 जण फरार
Roha, Raigad | Aug 30, 2025 ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत कुंडलिका पुलाशेजारी असलेल्या हॉटेल रोहा प्राईड येथे नाकाबंदीकरिता नेमण्यात आलेल्या पोलिसांनी मध्यरात्री एका संशयस्पद पीकअप टेम्पोचालकाला चौकशीकरिता थांबण्यास सांगितले. मात्र, पीकअप टेम्पो चालकाने गाडी न थांबविता पसार झाला. त्यानंतर सुरु झालेल्या थरारनाट्यात पोलिसांनी पाठलागकरुन चालकाची धरपकड केली. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख 65 हजार रुपये किंमतीचा टेम्पोभर मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.