उत्तर सोलापूर: इब्राहिम कुरेशीवर न्यायालयीन आदेशानुसार कारवाई : पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची माहिती...
तडीपारीचा प्रस्ताव राबविण्याच्या पार्श्वभूमीवर इब्राहिम कुरेशी यांनी उच्च न्यायालयात स्थगिती मागितली होती. यावेळी पोलिसांकडून आधीच म्हणणं मांडण्याची संधी दिल्याची बाब संबधीतकडून लपवण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त करत इब्राहिम कुरेशी यांच्यावर १ लाख रुपयांचा दंड ठोठवला आहे. या प्रकरणात न्यायालयीन आदेशानुसार लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी शनिवारी दुपारी 1 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली.