जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील निवडणूका होऊ घातलेल्या वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव व सिंदी (रेल्वे) या सहा नगर परिषदेच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडू नये व निवडणूका शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वान्मथी सी यांनी निवडणूकीच्या तयारीचे नियोजन, कायदा व सुरक्