पेण–खोपोली मार्गावर मंगळवारी (दि. 16) सायंकाळी सुमारे 7.15 वाजण्याच्या सुमारास चालत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. पुणे ते दापोली प्रवास करत असताना श्री कॉम्प्लेक्स, पेण–खोपोली रोड समोर ही घटना घडल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली.कारमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून प्रवाशांना बाहेर काढले. काही क्षणातच कारने पेट घेतला. सुदैवाने कारमधील तिन्ही प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.