* *अंबड-पाचोड रोडवर पोलिसांचा सिनेमा स्टाईल छापा! दुचाकीसह देशी दारूचा साठा जप्त* जालना जिल्ह्यातील अंबड-पाचोड रोडवर स्थानिक गुन्हे शाखा व अंबड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेकायदेशीर देशी दारू वाहतूक करणाऱ्या इसमाला रंगेहाथ पकडले. या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक इसम मोटरसायकलवरून विनापरवाना देशी दारूचे दोन बॉक्स चोरट्या विक्रीसाठी घेऊन जात असल्याची खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे अमलदार देविदास भोजने यांना मिळाली. माहितीची शहानिशा