सेनगाव: शेतकरी,कष्टकरी यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणे गुन्हा असेल तर तो आम्ही वारंवार करू,गजानन कावरखे
शेतकरी कष्टकरी व कामगाराच्या प्रश्नासाठी आवाज उठवणे हा जर गुन्हा असेल तर तो आम्ही वारंवार करू असे वक्तव्य क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी केले आहे. विविध मागण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाला धारेवर धरल्याने गजानन कावरखे, प्रहार जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे व अन्य एकावर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणे गुन्हा असेल तर तो आम्ही वारंवार करण्याचा इशारा गजानन कावरखे यांनी दिला आहे.