शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 25 डिसेंबर रात्री साडेनऊ वाजता ते दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास फिर्यादी उमेश अडवाणी यांच्या वर्ध्याच्या अंबिका चौकातील कापड दुकानात 3 चोरट्यांनी प्रवेश करत नगदी व कापड असा एकूण 60 हजारांचा मुद्देमाल चोरी झाले असल्याची तक्रार फिर्यादी यांनी शहर पोलिसात दिली आहे,पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शहर पोलीस करीत असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.