ब्रह्मपूरी: नागभीड ब्रह्मपुरी मार्गावर तंत्रनिकेतन कॉलेज जवळ राज्य राखीव दलाच्या गाडीची दुचाकीला धडक एक ठार तर एक गंभीर जखमी
नागभीड ब्रह्मपुरी मार्गे गडचिरोली येत असलेल्या राज्य राखीव पोलीस दल वटालियन क्रमांक बाराच्या मालवाहू चार चाकी ट्रकने एका मोटरसायकलला धडक दिल्याने सदर अपघातात एका युवकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची सदर घटना घडली आहे मालवाहू ट्रक चालक सीआरपीएफ जवान ज्ञानेश्वर ढाले यांच्यावर ब्रह्मपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे