नागपूर ग्रामीण: लोकसहभागातून 'आरोग्य संपन्न' महाराष्ट्र घडवूया : आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर
"राज्यातील आरोग्य सुविधा गावपातळीपर्यंत भक्कम करण्यासाठी 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' ही केवळ मोहीम नसून ती एक लोकचळवळ बनावी," असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी केले. नागपूर येथील एम्स रुग्णालयात आयोजित विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.या अभियानात उपचारांपेक्षा आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आरोग्यदायी जीवनशैलीवर भर देण्यात आला आहे.