कोरेगाव: केंद्र सरकारकडून पैसे घ्या आणि सरसकट शेतकऱ्यांना द्या, पुन्हा त्यांना उभे करा; आ. शशिकांत शिंदे यांची सरकारला विनंती
शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पीक गेले, जमीन वाहून गेलेली आहे अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पैसे घ्या आणि सरसकट शेतकऱ्यांना द्या, परंतु पुन्हा शेतकऱ्याला उभे करा, अशी राज्य सरकारकडे मागणी आहे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी मांडली. बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची आमदार शिंदे यांनी बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पाहणी केली.