दिव्यांग व्यक्तींच्या कुटूंबाकडून दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाचा सहज स्विकार, त्यामुळे त्यांना प्राप्त होणारे कौटूंबिक, भावनिक, मानसिक आणि सामाजिक स्थैर्य विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी दिव्यांग-अव्यंग विवाह प्रोत्साहन अनुदान योजना सन राबविण्यात येत आहे. सदर योजनेत कालानुरुप बदल करुन दिव्यांग-दिव्यांग हा पर्याय नव्याने समाविष्ट करण्यात आलेला असून या योजनेची अंमलबजावणी 18 डिसेंबर 2025 पासुन लागु करण्यात आली आहे.