चांदूर रेल्वे: शिवनी नजीक समृद्धी महामार्ग चैनल क्रमांक 116 येथे भीषण अपघात; सोयाबीन सोंगायला जाणारे सहा मजूर गंभीर जखमी
वल्ली तालुका नागभीड, जिल्हा चंद्रपूर येथील मजूर सोयाबीन सोंगायला जात असताना समृद्धी महामार्ग क्र. 116 शिवनी नजीक पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सहा मजूर गंभीररित्या जखमी झाले असून, यात महिलेसह इतर मजुरांचाही समावेश आहे.15 ते 16 मजूर मनबा कारंजा येथे सोयाबीन सोंगण्यासाठी टाटा एस गाडीतून जात होते. हे मजूर रात्री नऊच्या सुमारास गावातून निघाले होते. पहाटे सुमारास रस्त्यावर धुके दाटलेले असताना, लघुशंके शंकेसाठी गाडी कडेला लावून थांबले होते तेव्हा आयशर ट्रकने मागून धडक दिली.