राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) उमेदवाराकडून मतदारांना प्रलोभन देण्यासाठी चांदीच्या वाट्या वाटप केल्या जात असल्याचा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी केला आहे.वसंत मोरेंच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, त्यांच्या म्हणण्यानुसार हे वाहन प्रकाश कदम (राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार) यांचेच आहे.