ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प (टीएटीआर) येथून नवेंगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (एनएनटीआर) येथे चितळ स्थानांतराची दुसरी फेरी आज दि 25 नोव्हेंबर ला 12 वाजता यशस्वीरीत्या पूर्ण झाली. कोणतीही जिवितहानी न होता एकूण 63 चितळ सुरक्षितपणे जामनी गवताळ परिसरातून एनएनटीआरमधील सॉफ्ट-रिलीज एनक्लोजरमध्ये हलविण्यात आले.