बिहार मधील कालच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर बुलढाण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. काँग्रेस नावाचा पक्ष आता संपत चालला असून बिहारच्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान महाराष्ट्रातील जनता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही काँग्रेसला नाकारेल, असा दावा त्यांनी केला.