कामठी येथील दाल ओली नंबर २ परिसरात एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. घरात अचानक लागलेल्या आगीमुळे निर्माण झालेल्या धुराने श्वास गुदमरून यश संजय दिकोंडवर वय २८ वर्षे या तरुणाचा मृत्यू झाला. यश हा मानसिक आजारी असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव त्याला घरात बंद ठेवले होते, जे त्याच्या जीवावर बेतले.मिळालेल्या माहितीनुसार, यश हा मानसिक रुग्ण होता.