इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत सावकारी अंतर्गत गुन्ह्यांमधील मुख्य आरोपी रोहित वीग याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.रोहित विग व त्याच्या इतर साथीदारांनी फिर्यादी सुरेश शहाणी यांना वसुली करण्यासाठी चारचाकी वाहनात जबरदस्तीने नेऊन जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच गरजेपोटी घेतलेल्या रकमेपेक्षा जबरदस्तीने दानदुपटीने पैसे वसूल केले.इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने रोहित याला ताब्यात घेण्यात आले आहे.