गंगाखेड: उखळी खुर्द येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोन बैलाचा मृत्यू
गंगाखेड तालुक्यात पावसामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले उखळी खुर्द येथे ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी वसंत गुट्टे यांचे दोन बैल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बैलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यासह ग्रामस्थांच्या वतीने होत आहे