नागपूर शहर: केटी नगर येथील होमिओपॅथी दवाखान्यातून तीन लाख रुपये रोख चोरी
दहा नोव्हेंबरला रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे गिट्टी खदान हद्दीतील केटीनगर डॉक्टर प्रसाद व्यवहारे यांच्या होमिओपॅथी दवाखान्यातून अज्ञात आरोपीने ड्राव्हर मध्ये ठेवलेले तीन लाख रुपये चोरून नेले. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून गिट्टीखदान पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.