नागपूर ग्रामीण: विहीरगावात खळबळ: अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण
हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या विहीरगाव परिसरात आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.आज सकाळी विहीरगाव परिसरातील एका मोकळ्या जागेत स्थानिकांना एक व्यक्ती मृतावस्थेत पडून असल्याचे दिसले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तात्काळ या घटनेची माहिती हुडकेश्वर पोलिसांना देण्यात आली.