जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीत काल दि ५ डिसेंबर सायंकाळच्या सुमारास मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली. गावालगतच्या झुडपी जंगलात शौचासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीचा पिच्छा करत आरोपी किशोर मोरेश्वर रेपालकलवार (३५), रा. मानोरा, याने तिची छेड काढली आणि जबरदस्तीने झुडपात ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केला.गावातील दोन युवक आरोपीला जाब विचारण्यासाठी गेले. मात्र संतापलेल्या आरोपीने कातीने त्यांच्यावर अचानक हल्ला करून दोघांना जखमी केले. सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.