जालना: जालना शहरात स्वच्छता करा; आयुक्त अंजली शर्मा यांचा स्वच्छता निरीक्षकांना कडक इशारा
कॅरीबॅग आढळल्यास दुकानदारांवर ५ हजारा
Jalna, Jalna | Apr 9, 2026 जालना शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर आता महानगरपालिका प्रशासन आक्रमक झाले असून, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांनी स्वच्छता निरीक्षकांना स्पष्ट शब्दांत इशारा देत, शहरात स्वच्छता राखण्यात कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही, असे सांगितले. जालना महानगरपालिकेच्या सभागृहात आज स्वच्छता निरीक्षकांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांकडून य