जालना: पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेला लुटले; 1 लाख 40 हजाराच्या सोन्याच्या पाटल्या लंपास
Jalna, Jalna | Apr 9, 2026 जालना शहरातील यशवंत नगर परिसरात पोलीस असल्याचे भासवून दोन अज्ञात इसमांनी वृद्ध महिलेला फसवून तिच्या हातातील सोन्याच्या पाटल्या लंपास केल्याची घटना घडली आहे. गुरुवार दि. 9 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कमलबाई दिलीपराव हिवाळे रा. यशवंत नगर, जालना यांनी फिर्याद दिली आहे. त्या सकाळी सुमारे 7.30 वाजेच्या सुमारास कॉलनीतील रस्त्यावर फेरफटका मारत असताना ही घटना घडली.