घुग्घूस नगरपरिषद निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून, अंतिम टप्प्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदासाठी आपल्या अधिकृत उमेदवार म्हणून शारदा उर्फ पूजा दुर्गम यांची आज दि 17 नोव्हेंबर ला 12 वाजता निवड जाहीर केली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.