वर्धा आर्वी रोडवरील सुकळी बाई येथील बँक ऑफ इंडिया शाखेत रात्रीच्या सुमारास बँकेच्या मागच्या खिडकीचे सळाखी तोडून चोरट्यांनी चोरी केली असल्याची घटना दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी अंदाजे 10 वाजताच्या सुमारास समोर आली आहे.ही घटना सकाळी उघडकीस आली असून चोरट्यांनी सीसीटीव्ही सुद्धा तोडले असल्याचे दिसून आले. सावंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नेमका किती मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला याची माहिती समोर यायची आहे,पोलीस तपास सुरू आहे.