काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी नगरपरिषद निवडणुकीत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. काटोल नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) यांच्या संयुक्त उमेदवार अर्चना देशमुख यांनी 2376 मताधिक्य मिळवत नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे.