साक्री: परतीच्या पावसामुळे दातर्ती सह इतर गावात पिकांचे प्रचंड नुकसान; काढणीवर आलेली पिके भुईसपाट
Sakri, Dhule | Sep 29, 2025 गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे साक्री तालुक्यातील दातर्ती सह इतर गावात काढणीवर आलेल्या पिकांचे सोमवारी २९ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजता प्रचंड नुकसान झाले आहे.मक्याचे पीकही कापणीवर आले आहे. ठिकठिकाणी कपाशी वेचणीवर आलेली असतांना पावसात भिजून झाडावरील कापूस खराब झाला आहे. डौलदार वाटत असलेली बाजरी देखील पूर्णपणे भुईसपाट झाली आहे. सोयाबीनच्या शेंगा, मूग, उडीद, चवळी, कुळीथ, मठ यासारखी कमी उंचीची व जमिनीलगत असणारी कडधान्यादी पिके सुद्धा पावसाचे पाणी शेतात साचल्य