उल्हासनगर: उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात सुरक्षारक्षकाकडून रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाण,व्हिडिओ व्हायरल
उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णालयात असलेल्या सुरक्षारक्षक महिलेने रुग्णांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली आहे. सुरक्षारक्षक महिलेने नातेवाईकांना काठीने आणि हाताने मारहाण केल्याचा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरा चित्रीत झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.