जालना: आजच संधी! 0 ते 5 वर्षांतील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओची मात्रा द्या; माळीपुरा-जुना जालना भागात 6 केंद्रांवर दिवसभर मोही
Jalna, Jalna | Jun 28, 2026 आजच संधी! 0 ते 5 वर्षांतील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओची मात्रा द्या; माळीपुरा-जुना जालना भागात 6 केंद्रांवर दिवसभर मोहीम.. आज दिनांक 28 रविवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार देशाला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आज (रविवार) माळीपुरा व जुना जालना परिसरातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात येणार आहेत. या मोहिमेत कोणतेही मूल वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने विशेष नियोजन केल