जळगाव: जळगाव ते शिरसोली रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेच्या धक्क्याने वृध्द जागीच ठार; जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव ते शिरसोली दरम्यानच्या रेल्वे रूळावर एका ७३ वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुरूवातील अनोळखी म्हणून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. नंतर ओळख पटविण्यात आली. बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.