पुणे-अहिल्यानगर महामार्गावर कोरेगाव भीमा परिसरात सळईने भरलेल्या ट्रकला पहाटेच्या सुमारास पाठीमागून कारने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. निलम रामचंद्र दाभाडे (रा. मांजरी) असे मृत महिलेचे नाव आहे.