बीडमध्ये सोमवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जोरदार भाषण करत बीडकरांना मोठी हमी दिली. रात्री नऊ वाजता झालेल्या या सभेत त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत, बीडमध्ये विकासकामांची गती वाढवण्याचे आश्वासन दिले.“मला फक्त पाच वर्षे द्या… 35 वर्षांत जे झाले नाही ते मी करून दाखवतो!”बीडमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मशानभूमीच्या समस्येवर त्यांनी भाष्य केले.