अंजनगाव सुर्जी: न.प.येथे निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली पक्ष पदाधिकारी व इच्छुकांची मिटिंग;आदर्श आचार संहिता व आयोगाच्या सूचनांचे पालन करा
अंजनगावसुर्जी येथील नगर परिषदेच्या निवडणूकबाबत परदर्शक, भयमुक्त व कुठलाही अनुचित प्रकार न होता निवडणूक प्रकिया पार पडावी यासाठी येथील नगर पालिकेच्या सभागृहात रविवारी (ता. ०९) ला दुपारी १ वाजता निवडणूक विभागाकडून शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी व इच्छुक उमेदवरांची एक मिटिंग बोलावून त्यांना निवडणूक प्रक्रियेतील निवडणूक अर्ज दाखल करण्यापासून ते निकाल लागण्यापर्यंत उमेदवाराने व त्याच्या सहकाऱ्यांनी काळजी घेऊन कसे कामकाज करावे याबाबत माहिती दिली.