जळगाव: रामेश्वर कॉलनीत जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार; रूग्णालयात तणावाचे वातावरण, प्रकृती चिंताजनक
रामेश्वर कॉलनी येथील राज शाळेजवळ येथे जुन्या वादातून एका तरुणावर तीन ते चार जणांनी कोयता आणि चाकूने गंभीर वार करून गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्या तरूणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हर्षल कुणाल पाटील वय १८, रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.