अकोला: बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्या एक दिवसीय धरणे आंदोलन अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपन्न
Akola, Akola | Sep 17, 2025 अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बंजारा समाजाने अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले. आंध्रप्रदेश व तेलंगणात या समाजाला एस.टी. आरक्षण आहे, तसेच भाषावार प्रांत रचनेपूर्वी आंध्रप्रदेश व सी.पी. अॅण्ड बेरारमध्येही आदिवासी आरक्षण मिळत होते. मात्र महाराष्ट्रात आजही समाज वंचित आहे. नांदेड, परभणी, संभाजीनगर, उस्मानाबाद, बीड, जालना, लातूर, हिंगोलीसह राज्यातील सर्व जिल्ह्यांतील बंजारा समाजाला तात्काळ एस.टी. आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र