तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गावरील पेंडापूर फाटा येथे सोमवारी (दि. २४) दुपारी २ वाजता अवैधरीत्या सुरू असलेल्या देशी दारूच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. यात रामकृष्ण लिंबा भांबरे (वय ३२, रा. वडगाव) याआरोपीसच्या ताब्यातून २३०० रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी स्थागुशाचे पोअं बलवीरसिंग बहुरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी भांबरे विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोह मनोज घोडके अधिक तपास करीत आहेत.