अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सुचनांची आढावा बैठक मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सुनिल लहाने यांच्या अध्यक्षतेखाली 24 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. नागरिकांकडून प्राप्त हरकतींची शहानिशा करून अचूक माहिती सादर करण्याचे निर्देश देताना कोणतीही हलगर्जी किंवा विलंब खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. चुकीची माहिती दिल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीस अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, विभागप्रमु