म्हसळा येथील मौजे देहेन येथे अंतर्गत रस्ता डांबरीकरण या कामाचे भूमिपूजन तसेच जनसुविधा योजनेअंतर्गत देहेन अंतर्गत रस्त्याचे उदघाटन आज मंगळवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते पार पडले. या सोहळ्यास तालुक्यातील सर्व जेष्ठ-श्रेष्ठ मान्यवर, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ, पत्रकार बंधू आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. जनतेच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या मदतीने ही कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून ग्रामविकास साधण्याचा आमचा प्रयत्न सदैव सुरू राहील.