पाटोदा: पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात हुज्जत घातल्याने तेरा जनावर अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
Patoda, Beed | Oct 5, 2025 पंकजा मुंडे दसरा मेळाव्याच्या दरम्यानरॅलीला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी संबंधित तरुणांना पार्किंगमध्ये गाड्या पार्क करून मेळाव्यासाठी जाण्याचे सांगितले. मात्र, त्या वेळी काही युवकांनी पोलिसांशी उद्धट वर्तन करत त्यांच्याशी अरेरावी केली. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचेही उल्लंघन केले. या प्रकारानंतर अंमळनेर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित 13 जणांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.