नागपूर महानगरपालिकेच्या रणधुमाळीतील प्रचाराचा आज अखेरचा दिवस होता. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला आरोपांच्या फैरी आणि घोषणांचा पाऊस आज सायंकाळी थांबला असून 'प्रचाराच्या तोफा' आता अधिकृतपणे थंडावल्या आहेत.निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रचार थांबवण्यात आला असून, आता सर्वांचे लक्ष १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे.आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली होती.