रोहा: सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात तळा, अलिबाग तालुक्यातील पदाधिकारी–कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Roha, Raigad | Nov 2, 2025 आज रविवार दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात तळा आणि अलिबाग तालुक्यातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी तळा तालुक्यातील दिलीप घाणेकर, लक्ष्मण घाणेकर तसेच अलिबाग तालुक्यातील परशुराम म्हात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष या नात्याने सर्व नवप्रवेशितांचे पक्षात स्वागत करून त्यांना आगामी राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.