निफाड: चांदोरी बसस्थानकात गार्गीने दाखवला जनजागृतीचा आदर्श,
नाशिक ग्रामीण पोलिसांचा ‘डायल ११२’ जनजागृती व्हिडीओ प्रसिद्ध
शिरव
Niphad, Nashik | Oct 17, 2025 चांदोरी बसस्थानकात गार्गीने दाखवला जनजागृतीचा आदर्श, नाशिक ग्रामीण पोलिसांचा ‘डायल ११२’ जनजागृती व्हिडीओ प्रसिद्ध :- आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने नाशिक ग्रामीण पोलिसांनी ‘डायल ११२’ या सेवा क्रमांकाविषयी जनजागृतीसाठी आकर्षक व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओतून पोलिस, अग्निशमन दल आणि वैद्यकीय सेवांचा त्वरित लाभ एका फोनवर कसा मिळू शकतो, याची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे.