अकोला: निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला घरपोच — डाक विभागाची सुविधा
Akola, Akola | Nov 10, 2025 अकोला : पेन्शनसाठी दरवर्षी सादर करावा लागणारा हयातीचा दाखला आता पोस्टमनकडून घरपोच मिळणार आहे. ‘नो टेन्शन फॉर पेन्शन’ या उपक्रमांतर्गत डाक विभागाने ही सुविधा सुरू केली आहे. केंद्र, राज्य शासन व महामंडळातील निवृत्तीधारकांना आधार क्रमांक, बँकेचे नाव व पेन्शन पेमेंट ऑर्डर दिल्यास हयातीचे प्रमाणपत्र घरपोच दिले जाईल. या सेवेसाठी ७० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सेवानिवृत्तीधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर डाकघर अधीक्षकांनी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध पत