जालना: निवृत्त पोलीसाचे घर फोडले; जालना शहरातील लक्ष्मीनगर येथील घटना; 2 लाख 88 हजाराचा सोन्याचा ऐवज लंपास
Jalna, Jalna | Apr 7, 2026 जालना शहरातील लक्ष्मीनगर मंठा चौफुली परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी निवृत्त पोलिसाच्या घरातून सुमारे 2 लाख 88 हजार 690 रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला आहे. मंगळवार दि. 7 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सुदाम दुधा पवार रा. लक्ष्मीनगर मंठा चौफुली, जालना यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते सेवानिवृत्त पोलीस आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते दि. 4 मार्च रोजी ते बाहेरगावी गेले होते.