जालना: शिकलकरी मोहल्ल्यातून लोखंडी सळई चोरी प्रकरण उघड; एक आरोपी ताब्यात, दुसरा फरार
Jalna, Jalna | Apr 3, 2026 शहरातील शिकलकरी मोहल्ला परिसरात लोखंडी सळई चोरीचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतले तर दुसरा आरोपी पसार झाला आहे. शुक्रवार दि. 3 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सदर बाजार पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील पोलीस कर्मचारी धनाजी विजय कावळे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 1 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 2 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत बीट मार्शल ड्युटीवर असताना गुप्त माहिती मिळाली होती.