जालना: आयुत्त आजली शर्मा याना आठड्यातुन 3 दिवस भेटा येनार नगर सेवकासह नागरिकाची नाराजी
Jalna, Jalna | May 19, 2026 जालना महानगरपालिकेतील नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, मनपा आयुक्तांच्या नव्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आठवड्यातील फक्त तीन दिवस आणि त्यातही केवळ तीन तास नागरिकांना भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, परवानग्या यांसारख्या मूलभूत प्रश्नांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. मनपा प्रशासनाने लावलेल्या फलकानुसार आयुक्त आता सोमवार, बुधवार आणि गुरुवार या तीन दिवसांमध्ये स