भोकरदन: शहरासह तालुक्यातील दानापूर, पारध व इतर भागात पावसाची दमदार हजेरी
आज दिनांक 24 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील धावडा, पारध, दानापूर व शहरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे, या पावसाने मागील काही दिवसांपासून खोळंबलेल्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होणार असल्याचे पाहायला मिळत आहे, कारण दोन दिवस झाले तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून बळीराजा शेत शिवारात खरीप पेरण्या करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.