सेनगाव: तहसील कार्यालयात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी ठिय्या आंदोलन
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज तहसील कार्यालय सेनगांव या ठिकाणी या आंदोलन पुकारून निषेध नोंदविण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये शेतकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या प्रलंबीत व रखडलेल्या अतिवृष्टीच्या अनुदानासाठी तसेच घरकुल व सिंचन विहिरीच्या अनुदानासाठी या सह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने 3 तास ठिय्या आंदोलन पुकारून निषेध नोंदविण्यात आला.