कल्याण: खडवली ग्रामपंचायत हद्दीत मतदार यादीत घोळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना निवेदन
Kalyan, Thane | Oct 21, 2025 खडवली ग्रामपंचायत हद्दीतील बोगस मतदार असून मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाने यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. बोगस मतदारांना शिवसेना स्टाइलने धडा शिकवू असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. बोगस मतदार व यादीत घोळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाने केली असून या संदर्भात आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11च्या सुमारास ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन दिलं आहे.