महाड: पनवेलमध्ये भटक्या श्वानांवर नियंत्रणाची गती वाढणार; प्राणी जन्म नियंत्रण समिती सक्रिय
Mahad, Raigad | Nov 29, 2025 भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पनवेल महानगरपालिका सज्ज झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुमोटो याचिका क्रमांक 05/2025 च्या अनुषंगाने राज्य शासनाने 24 नोव्हेंबर 2025 रोजी सर्व महानगरपालिकांना दिलेल्या निर्देशांनुसार पनवेल मनपेत प्राणी जन्म संनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.